केलेल्या कुठल्याही चुकीसाठी ‘क्षमायाचना’ न करणं, हाच भारतीय राजकारणाचा पाया आहे!
भारतामध्ये आपण फक्त एक साधी ‘क्षमायाचने’ची अपेक्षा करत आहोत. ज्यासाठी भारतीय राजकारणी लोकांनी जनतेची ‘क्षमा’ मागायला हवी, अशा घटनाही इथं भरपूर आहेत. तरीही, योगी आदित्यानाथ यांनी केलेलं गुन्ह्यांचं समर्थन पाहून असं वाटतं की, आपण केलेल्या कुठल्याही चुकीसाठी क्षमायाचना न करणं, हाच भारतीय राजकारणाचा पाया आहे.......